20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये रंगणार फुटबाॅलचा महासंग्राम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कतार, 03 नोव्हेंबर :-  जगातील बहुतांश देश खेळत असणार खेळ म्हणजे फुटबाॅल. प्रसिध्द असणार्या फुटबाॅलचा विश्वचषक यंदा कतार येथे होत असून 20 नोव्हेंबरपासून कतारमध्ये फुटबाॅलचा महासंग्राम रंगणार आहे. फुटबाॅलचा विश्वचषक अर्थात FIFA वर्ल्डकप यंदा कतारमध्ये खेळवला जाता आहे. पहिला सामना यजमान कतार आणि इक्वाडोर संघात 20 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत जगभरातील फुटबाॅल खेळणारे 32 सर्वोत्तम संघ सहभागी होत असून 20 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीत ही स्पर्धा पार पडणार आहे.

कसे आहेत FIFA वर्ल्ड कप चे ग्रुप?

ग्रुप A – कतार, इक्वेडोर, सेनेगल, नेदरलॅंड
ग्रुप B – इंग्लंड, इराण, अमेरिका, वेल्स
ग्रुप C – अर्जेंटिना, सौदी अरेबिया, मेक्सिको, पोलंड
ग्रुप D – फ्रान्स, आॅस्ट्रेलिया, डेन्मार्क, ट्यूनिशिया
ग्रुप E – स्पेन, कोस्टा रिका, जर्मनी, जपान
ग्रुप F – बेलजियम, कॅनडा, मोरोक्को, क्रोएशिया
ग्रुप G – ब्राझील, सर्बिया, स्वित्झर्लंड, कॅमेरून
ग्रुप H – पोर्तुगाल, घाना, उरूग्वे, कोरिया प्रजासत्ताक

ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येक संघ त्यांच्या गटातील इतर तीन संघांविरूध्द एक समाना खेळेल. प्रत्येक गटातील टाॅप 2 संघ राउंड ऑफ 16 च्या फेरीत प्रवेश करतील. जिथून बाद फेरीचे सामने सुरू होतील. म्हणजेच विजयी संघ पुढे जातील आणि पराभूत संघ विश्वचषकातून बाहेर होतील. राउंड ऑफ 16 मध्ये आठ सामने होतील, ज्यामध्ये 16 पैकी आठ संघ सामना जिंकून उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. उपांत्यपूर्व फेरीत चार सामने होणार असून विजयी दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य फेरीनंतर अंतिम सामना 18 डिसेंबरला खेळवला जाईल.

ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान होतील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतरदररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राउंड ऑफ 16 चे समाने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्ण फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसर्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम सामना होईल. या सर्व सामन्यासांठी 5 वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.3. आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होती. हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत.
Viacom- 18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 च्या प्रसारणाचे हक्क आहेत. ज्यामुळे स्पोट्स 18 आणि स्पोट्र्स 18 एचडी चॅनलवर सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच Voot Select आणि जीओ टिव्ही वर सामन्यांचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.

हे पण वाचा :-

 

footballtournament