कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाऊन गरजेचं; सरकार आज घेणार निर्णय!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली 03 मे : देशात मागील चोवीस तासांत साडेतीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जवळपास पन्नास देशांमध्ये एका दिवसात मिळालेल्या रुग्णसंख्येपेक्षाही अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार अत्यंत वेगानं होत असल्यानं तो रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनची मागणी कोविड टास्क फोर्सच्या सदस्यांनी केली आहे. या सदस्यांमध्ये एम्स आणि इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सामील आहे. यावर केंद्र सरकार आज निर्णय घेऊ शकतं.

ICMR चा असा अंदाज आहे, की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं अजून उच्चांक गाठलेला नाही. हा पीक आणखी बाकी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की या स्थितीमध्ये कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याासाठी दोन आठवड्यांचं लॉकडाऊन गरजेचं आहे. केंद्रानं अद्यार एम्स आणि ICMR च्या सल्ल्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 3 मे नंतर केंद्र यावर निर्णय घेणार आहे. असं म्हटलं जात आहे, की सरकार पूर्ण नाही तर अंशतः लॉकडाऊनची घोषणा करू शकतं.

अशोका युनिव्हर्सिटीमधील त्रिवेदी स्कूल ऑफ बायोसायन्सचे डायरेक्टर आणि व्हायरोलॉजिस्ट डॉ. शाहिद जमील यांनी सांगितलं, की मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा पीक येऊ शकतो. आताच हे सांगता येणार नाही की किती रुग्णसंख्या होईल. हा आकडा दररोज 5-6 लाखावरही पोहोचू शकतो. हा आकडा देशातील निर्बंध आणि लोकांकडून नियमांचं पालन होण्यावर अवलंबून असेल. डॉ. जमील यांच्या म्हणण्यानुसार, सर्व नियमांचं पालन केल्यास मे महिन्याच्या शेवटापर्यंत देश कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून बाहेर येऊ शकतो. मात्र, लोक आताप्रमाणेच नियम पायदळी तुडवत राहिल्यास ही लाट आणखी बराच काळ टिकून राहिल.

covid 2 phasecovid vaccinationlockdownmodi govt