पुण्यातील गहुंजेत ‘हे’ खेळाडू घालणार नव्या विक्रमाला गवसणी

  • आजपासून इंग्लंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना.
  • विजयाच्या निर्धाराने झुंजणार विराट सेना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

पुणे डेस्क, दि.  २३ मार्च: पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान आतापर्यंत फक्त १ वनडे सामना झाला आहे. हा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे पहिला वनडे सामना जिंकत दुसरा विजय नोंदवण्याची भारताकडे संधी असेल. तर इंग्लंडचा या मैदानावर हा पहिला वनडे विजय असेल.

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे येथे मंगळवारी (२३ मार्च) पहिला वनडे सामना रंगणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यात वनडे क्रिकेट इतिहासातील कित्येक जुने विक्रम मोडताना आणि नवे विक्रम बनताना दिसतील

भारत आणि इंग्लंड संघांनी आजवर एकूण १०० वनडे सामने खेळले आहेत. त्यापैकी ५३ सामन्यात भारताने तर ४२ सामन्यात इंग्लंडने बाजी मारली आहे. उर्वरित २ सामने बरोबरीत आणि ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. अशात हा सामना जिंकत भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ५४ वा वनडे विजय नोंदवण्याची संधी असेल. तर इंग्लंडचा हा ४३ वा वनडे विजय असेल.

  पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान आतापर्यंत फक्त १ वनडे सामना झाला आहे. हा सामना भारताने जिंकला होता. त्यामुळे पहिला वनडे सामना जिंकत दुसरा विजय नोंदवण्याची भारताकडे संधी असेल. तर इंग्लंडचा या मैदानावर हा पहिला वनडे विजय असेल.

या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहली ८८ चेंडूंचा सामना करत, वनडेत १३ हजार चेंडू खेळणारा चौथा भारतीय ठरेल. त्याच्यापुर्वी भारतीय दिग्गज सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड यांनी वनडेत १३ हजार चेंडू खेळले आहेत.

इंग्लंडचा कर्णधार ऑयन मॉर्गनला या सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी असेल. जर त्याने या सामन्यात १४६ धावांची खेळी केली, तर तो वनडेत ७००० धावा करणारा पहिला इंग्लंडचा फलंदाज ठरेल.

सध्या भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नावे ७१ आंतरराष्ट्रीय शतकांची नोंद आहे. जर त्याने या सामन्यात शतक झळकावले, तर तो ऑस्ट्रेलियन दिग्गज रिकी पाँटिंग यांची बरोबरी करेल. पाँटिग यांनी त्यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत एकूण ७१ शतके केली होती.

अष्टपैलू कृणाल पंड्या या सामन्यातून आपले वनडे पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे. जर त्याला अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळाले तर भारताकडून वनडे पदार्पण करणारा २३३ वा खेळाडू ठरेल.

भारताचा विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा वनडेतील २५० षटकार पूर्ण करण्याच्या विक्रमाच्या खूप नजीक आहे. यासाठी त्याला अवघ्या ६ षटकारांची आवश्यकता आहे. जर त्याने या सामन्यात ६ षटकार मारले, तर तो भारताकडून वनडेत २५० षटकार मारण्याचा विश्वविक्रम नोंदवेल.

भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्या या सामन्यात ४ षटकार मारत वनडेतील ५० षटकारांचा आकडा पूर्ण करेल. त्याच्यापुर्वी भारताकडून १२ क्रिकेटपटूंनी हा किर्तीमान केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५० षटकार ठोकण्याचा विक्रम करण्याची रोहित शर्माकडे संधी आहे. तो या विक्रमापासून अवघे १४ षटकार दूर आहे. त्याच्यापुर्वी ख्रिस गेल आणि ब्रेंडन मॅक्युलम यांनी हा पराक्रम केला आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी इंग्लंडची टीम

इयॉन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सॅम बिलिंग्स, जॉस बटलर, सॅम करन, टॉम करन, लियम लिविंगस्टोन, मॅट पर्किंसन, आदिल रशीद, बेन स्टोक्स, रीस टॉपले, मार्क वुड, ख्रिस जॉर्डन, जॅक बॉल आणि डेव्हिड मलान.

एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, केएल राहुल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि शार्दुल ठाकूर.

Pune sports hub