मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत

मराठा आरक्षण प्रश्नी ही भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 08 जून :- कोरोना परिस्थितीवर उपाययोजना आणि मराठा आरक्षणाच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण हे  दिल्लीत दाखल झाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार हे आज सकाळीच मुंबईहून दिल्लीला विशेष विमानाने रवाना झाले होते. सकाळी 9 च्या सुमारास दिल्ली विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र सदनात दाखल झाले आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सकाळी 11 वाजता भेट होणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण देखील राहणार उपस्थित राहणार आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या भेटीनंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रातील कोविड 19 संसर्ग परिस्थिती, लसीकरण, GST परतावा या संदर्भात महत्वाची चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधी सुद्धा पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून राज्यासाठी मदत मागितली होती. पण अजूनही केंद्राकडून पुरेशी मदत मिळाली नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे. एवढंच नाहीतर हक्काचे असलेली जीएसटीचा परतावा सुद्धा केंद्र सरकारने दिलेला नाही, त्यामुळे काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी याबद्दल मागणी केली होती. आता खुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहे. त्यामुळे या भेटीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

हे पण वाचा: –पुणे : केमिकल कंपनीत आग 18 जणांचा मृत्यू , DNA घेऊन पटवणार मृतांची ओळख

ajit pawarAshokAshok ChavhanCM Uddhav ThakarayMarataha aarakshanmodi meet