देशात 13 एप्रिलनंतर पहिल्यांदाच 2 लाखांहून कमी रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासांत 3511 रुग्णांचा मृत्यू

देशातील रुग्णसंख्येचा आलेख उतरणीला लागला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली 25 मे:– देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे  सलग चौथ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 26 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 96 हजार 427 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या दोन लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात 3 हजार 511 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले, त्याचप्रमाणे कोरोनाबळींच्या संख्येतही घट झाल्याने दिलासा मिळत आहे. 

देशातील आजची कोरोना स्थिती : 

 

एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 69 लाख 48 हजार 874
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : दोन कोटी 40 लाख 54 हजार 861
एकूण सक्रिय रुग्ण : 25 लाख 86 हजार 782
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 3 लाख 7 हजार 231

भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) ने सांगितलं की, भारतात काल (सोमवारी) कोरोनामुळे 20 लाख 58 हजार 112 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले. काल देशात एकूण 33 कोटी 25 लाख 94 हजार 176 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.

महाराष्ट्रात काल (सोमवारी)  42,320 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 22,122 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 361 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहेत. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. राज्यात काल एकूण 3,24,580  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

covid casecovid second pahseindian covid caselow rate of last maonth