ICMRचा महत्त्वाचा निर्णय ; आता घरच्या घरी कोरोना अँटिजेन टेस्ट करता येणार

पुण्यातील माय लॅबच्या किटलाही मंजुरी देण्यात आलीय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क 20 मे:- आता तुम्ही घरबसल्या कोविड-19 चाचणी करु शकता. आयसीएमआरने कोविड-19 च्या चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिली आहे. हे एक होम रॅपिड अँटिजेन टेस्टिंग किट आहे. याचा वापर कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले किंवा बाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेले लोक करु शकतात.या रॅपिड अँटिजेन टेस्टसाठी नाकातून स्बॅव घ्यावा लागणार आहे. महत्त्वाचं म्हणजे घरात केलेल्या चाचणीचा अहवाल अॅपच्या माध्यमातून आयसीएमआरपर्यंत पोहोचेल आणि तिथे तो गोपनीय ठेवला जाईल.

आयसीएमआरने कोविड चाचणीसाठी होम बेस्ड टेस्टिंग किटला मंजुरी दिल्यानंतर आता चाचणी करणं अतिशय सोपं होणार आहे. भारतात सध्या केवळ एकाच कंपनीला यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मायलॅब डिस्कव्हरी सॉल्युशन लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे.

होम टेस्टिंग मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. या अॅपचं नाव Mylab Coviself आहे. होम टेस्टिंग करणाऱ्या सर्व युझर्सना हे अॅप डाऊनलोड करावं लागेल. या मोबाईल अॅपमध्ये टेस्टिंगची संपूर्ण प्रक्रिया योग्य प्रकारे समजावण्यात आली आहे. हे अॅप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह निष्कर्ष देतं. अॅप डाऊनलोड करुन नोंदणी केलेल्या मोबाईलमध्येच सर्व युझर्सना चाचणी पूर्ण झाल्यानंतर टेस्ट स्ट्रिपचा फोटो घ्यायचा आहे. या अॅपमध्ये असलेला डेटा सुरक्षित सर्व्हरवर जमा केला जाईल, जो आयसीएमआर कोविड-19 च्या टेस्टिंग पोर्टलशी कनेक्टेड असेल.

हे पण वाचा :-राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार

ICMR aprovedIndia covid 19raid test kittasting kittest in at home