पहिल्याच सामान्यात भारताने पाकिस्तानला चाटवली धूळ

भारतीयांना दिली दिवाळीची भेट, विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने आणला खेचून
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टीम इंडिया ने टी-20 वल्र्ड कप मध्ये विजयी सलामी दिली आहे. पहिल्याच सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव कर पाकिस्तानला धूळ चाटवत भारतीयांना दिवाळीची भेट दिली आहे. विराट आणि हार्दिक पंड्याने हरत आलेला सामना विजयाच्या दिशेने खेचून आणत विजय प्राप्त केला आहे.

टीम इंडियाला पाकिस्तानकडून 160 रन्सचं आव्हान मिळाले होते. पाकिस्तानची ही फलंदाजी करताना फारशी चांगली सुरूवात झाली नाही. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला पहिल्याच चेंडूवनर अर्शदीप ने तंबूचा मार्ग दाखवला. सलामीवीर मोहम्मद रिझवानही जास्त वेळ टिकला नाही. 4 धावांवर असतांना अर्शदीप ने सेटअप लावत आपल्या जाळ्यात अडकवले. 15 धावांवर पाकिस्तानचे दोन गडी बाद झाले होते.

शमी नंतर हार्दिक ने शादाब 5, हैदर अली 2, मोहम्मद नवाझ 9 रनांवर माघारी पाठले. दुसरीकडे शान मसूद ने शेवटपर्यंत नाबाद राहत एक बाजू लावून धरली होती. त्याने 52 धावा केल्या. शेवटला शाहिन आफ्रिदीने एक चैकार आणि 1 षटकार मारत 16 धावा केल्या. भारताच्या फलंदाजीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

टीम इंडियाची सुरूवात अत्यंत खराब झाली. ओपनर रोहित शर्मा आणि केएल राहुल अवघ्या 4 रन्सवर बाद झाले. लोकेश 4, रोहित 4, सुर्यकुमार यादव 15 व अक्षर पटेल 2 असे चार फलंदाज 31 धावांवर माघारी परतले. विराट कोहली व हार्दिक पंड्या या जोडीवरच आता टीम इंडियाची सर्व भीस्त होती. भारताला अखेरच्या 10 षटकात 115 धावांची गरज असतांना पाहुन विराटने गिअर बदलला. 12 व्या षटकात मोहम्मद नवाजच्या एक षटकात त्याने तीन खणखणीत षटकार खेचले. दोघांनी अर्धशतकी भागीदारी करत 15 षटकांत शतकी पल्ला गाठून दिला. भारताला 30 चेंडूत 60 धावा विजयासाठी हव्या होत्या.

हार्दिक ने ही व्टेंटी-20 त 1000 धावा व 50 विकेट्स असा अष्टपैलू विक्रम नोंदविला. असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय ठरला. शहिद आफ्रिदी, शाकिब अल हसन, ड्वेन ब्राव्हो, थिसारा परेरा, मोहम्मद हाफिज, मोहम्मद नबी, केव्हीन ओब्रायन यांनी हा पराक्रम केला आहे.

हे पण वाचा :-

बालसदन घोट येथे एक दिवसीय दीपावली उत्सव साजरा

राष्ट्रीय आयुर्वेद दिन तसेच धन्वंतरी जयंती 

cricketIndiateam