नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून होणार्या हल्ल्याला उत्तर म्हणून भारतीय सैनिकांनी आज मोठी कारवाई करण्यात आली.
चार फॉरवर्ड पोस्ट उद्ध्वस्त.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
श्रीनगर, 10 जानेवारी:- सीमेपलीकडून कुरघोडी करणारे पाकिस्तानी सैनिक सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहेत. पाकिस्तान सैन्याकडून पुन्हा एकदा सीमेपलिकडून तुफान गोळीबार करण्यात आला होता. त्याला भारतीय सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काश्मीरमधील राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाक सैन्याला जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.
या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या सैन्याने 3 सैनिक ठार झाले आहेत. अनेक पाकिस्तानी सैनिक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवानांनी पाकिस्तानी लष्कराच्या चार फॉरवर्ड पोस्ट्स उद्ध्वस्त केल्या आहेत. LOC वर पाकिस्तानी लष्करानं सीमा सुरक्षेच्या नियमाचं उल्लंघन करत तुफान गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला भारतीय जवानांनी सडेतोड उत्तर दिलं.