भडकाउ भाषण भोवले : आझम खान यांना 3 वर्ष  कारावास

25 हजारांचा दंड, आमदारकी रद्द होण्याची शक्यता
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रामपूर, 27, ऑक्टोबर :-  गुरूवारी रामपूर न्यायालय ने समाजवादी पार्टी चे नेते आणि आमदार आझम खान यांना भडकाउ भाषण केल्या प्रकरणी 3 वर्ष कारावास आणि 25 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे.

2019 च्या लोकसभा निवडणूकी दरम्यान आझम खान यांनी एक भाषण केले होते. याच भाषणात त्यांनी भडकाउ वक्तव्य केल्या प्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीची नोंद घेउन खटला उभा करण्यात आला आणि दोन्ही बाजूंची सुनावणी झाली. त्यानंता आज गुरूवारी न्यायालयाने आझम खान यांना दोषी मानत 3 वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द होण्याची शक्यता आहे. असे असले तरी त्यांना या प्रकरणात जामीन मिळू शकतो. त्यांच्याकडे जामीन मिळवण्यासाठी एक महिन्याचा वेळ आहे.

आझम खान यांना 2 वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाल्यास त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल आणि त्यांचे विधिमंडळ सदस्यत्व रद्द होईल हे आधिच स्पष्ट झाले होते. त्यामुळे आझम खान यांच्या वकिलांनी शिक्षा कमीतकमी व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न केला होता. मात्र फिर्यादी पक्षाने आझम खान यांना नियमानुसार मोठी शिक्षा व्हावी असा प्रयत्न केला.

हे देखील वाचा :-

 

khanMLA Azam