भिमा कोरेगांव शौर्यदिन कार्यक्रमास मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

यंदाच्या वर्षी भिमा कोरेगांव विजयस्तंभाला अभिवादन करणेसाठी भिमा कोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलेले आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे डेस्क, दि. ९ डिसेंबर :  भिमा कोरेगांव शौर्य दिन कार्यक्रम ०१ जानेवारी २०२२ रोजी मोठया संख्येने साजरा होणार असून याठिकाणी अभिवादनासाठी येणाऱ्या भिम अनुयायांना सर्व प्रकारच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून जयत तयारी सुरू झालेली आहे.

मागील वर्षी कोविड-१९ मुळे उत्सव मर्यादीत स्वरूपात साजरा करण्यात आला होता परंतु यंदा मात्र कोविडचे प्रमाण अत्यंत कमी असल्याने उत्सव मोठया प्रमाणात साजरा होणेबाबत भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समिती व जिल्हा प्रशासनाच्यावतीने सातत्याने बैठका घेण्यात आल्या होत्या. काल या संदर्भामध्ये जुनी जिल्हा परिषद पुणे येथे मा.तहसिलदार व सहाय्यक पोलीस आयुक्त यांचेसमवेत इतर सर्व विभागाच्या अधिकान्याशी व आंबेडकर समाजातील पक्ष संघटनांशी संयुक्त बैठक सुमारे तीन तास पार पाडली. यात जिल्हा प्रशासनाने सदर ठिकाणी संरक्षणा पिण्याचे पाणी वाहतुकीची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था इत्यादी प्रकारच्या पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

यंदाच्या वर्षी भिमा कोरेगांव विजयस्तंभाला अभिवादन करणेसाठी नेहमीप्रमाणे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, उर्जामंत्री नितिन राऊत, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर यांच्यासह इतर अनेक मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत.

यंदाच्यावर्षी मात्र या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी उपस्थित राहून शासनाच्यावतीने अभिवादन करावे. याबाबतचे निमंत्रण भिमा कोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्यावतीने देण्यात आलेले आहे. त्याचा स्विकार मुख्यमंत्री करतील व अभिवादनासाठी येतील असा विश्वास समितीला वाटत आहे.

दरम्यान यंदाच्यावर्षी सर्व राजकीय पक्षाच्या अभिवादन सभा आंबेडकरी साहित्य विक्रीचे स्टॉल याचा देखील कार्यक्रमात समावेश राहणार आहे. दरम्यान भिमाकोरेगांव विजयस्तंभाचे राष्ट्रीय स्मारक व्हावे याबाबतची घोषणा शासनाच्यावतीने

लवकरात लवकर करावी अशी विनंती समितीच्यावतीने सरकारकडे करण्यात आलेली आहे तरी उत्सवात नागरीकानी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भिमा कोरेगांव विजयस्तंभ शौर्यदिन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा : 

हेलिकॉप्टर दुर्घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक – जलसंपदा मंत्री जयंत पाटील

तीन गावठी पिस्टल व सहा जिवंत काडतुसासह दोघांना अटक…

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढ्याची २० पिल्ले मृत तर चार गायब…

 

lead news