छत्तीसगड मध्ये पोलीस – नक्षल चकमकित जहाल माओवादी रुपेश मडावीसह दोघांचा छत्तीसगड पोलिसांनी केला खात्मा..

लोकसभा निवडणुकीत माओवाद्यांनी कोठी इथे मतदान केंद्रावर बीजीएलचा मारा केला होता. त्यातही रुपेश मडावीची प्रमुख भूमिका होती. दहापेक्षा जास्त हप्त्याचे जाळपोळीचे आणि इतर गंभीर गुन्हे रुपेश मडावीवर दाखल करण्यात आला आहे. तीन राज्यात मिळून 75 लाखापेक्षा जास्त बक्षीस आहे. रुपेशच्या मृत्यूने माओवाद्यांच्या संघटनेला मोठा हादरा बसल्याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या छत्तीसगड राज्यातील नारायणपूर जिल्ह्यात सोमवारी (दि. २३) झालेल्या चकमकीत पोलिसांनी ३ नक्षल्यांना कंठस्नान घातले. यात गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी आणि नक्षल्यांच्या दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचाही समावेश होता. रुपेश मडावीवर तीन राज्यात मिळून ७५ लाखाचे बक्षीस जाहीर केले असून चकमकीदरम्यान खात्मा झाला असून ओळख पटली आहे .त्याचं नाव रुपेश मडावी आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर अबूझमाडच्या जंगलात छत्तीसगडच्या सुरक्षा दलांसोबत काल झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले होते.

अबुझमाड जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाल्यानंतर छत्तीसगड पोलिसांनी त्या भागात अभियान राबविण्यास सुरुवात केली. दुपारी ४ च्या सुमारास पोलिस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यात दोन पुरुष आणि एक महिला असे तीन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. त्यातील एकाची ओळख पटली असून रुपेश मडावी असे त्याचे नाव आहे. या चकमकीत पोलिसांनी घटनास्थळावरुन एक एके ४७ बंदूक आणि अन्य स्फोटक साहित्यही जप्त केले आहे.

रुपेश मडावी हा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील देचलीपेठा पोलिस ठाण्यांतर्गत सिंदा गावचा रहिवासी होता. मागील २० वर्षांपासून तो गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता. हत्या, खून आणि जाळपोळीचे त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात ६६ गुन्हे दाखल होते. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर २५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. शिवाय छत्तीसगड राज्याचेही त्याच्या शिरावर बक्षीस होते.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भामरागड तालुक्यातील
कोठी येथील मतदान केंद्रावर नक्षल्यांनी पोलिसांवर
बीजीएलचा मारा केला होता. त्यात रुपेशचा सहभाग असल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

naxal
Comments (0)
Add Comment