कर्नाटकात चामराजनगरमध्ये ऑक्सिजनअभावी 24 रुग्णांचा मृत्यू

मुख्यमंत्री येदियुरप्पांकडून चौकशीचे आदेश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कर्नाटक डेस्क 03 मे: कर्नाटकमधील चमराजनगरमध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय. जिल्हा प्रशासानानं रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता असल्याचं मान्य केलंय, मात्र हे मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं नाहीत, तर रुग्णांची तब्येत बिघडल्यामुळं झाले, असं रुग्णालय प्रशासनानं सांगितलंय. विशेष म्हणजे, 24 रुग्णांचे प्राण गेल्यानंतर रुग्णालयात ऑक्सिजनचे 60 सिलेंडर दाखल झाले. तसेच या रुग्णालयात म्हैसूरहून ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. मात्र म्हैसूरमधील ऑक्सिजनची गरज वाढल्यानं हा पुरवठा वेळेवर होत नसल्याचीही माहिती देण्यात आली आहे. 

जिल्हा प्रशासनाचं म्हणणं आहे की, या रुग्णांचा मृत्यू ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे नाहीतर इतर आजारांमुळे झाला आहे. परंतु, मीडिया रिपोर्ट्सनुसार, रुग्णालयातील दृश्यांवरुन स्पष्ट होतंय की, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे 24 लोकांचा जीव गेलाय. संपूर्ण घटनेनंतर 60 ऑक्सिजन सिलेंडर रुग्णालयात दाखल झाले आहेत. 

या घटनेनंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांनी उद्या मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. विरोधी पक्ष काँग्रेसने हा मुद्दा लावून धरत येदियुरप्पा यांच्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कोरोना संकट रोखण्यासाठी सरकारकडे कोणताच प्लान नाहीये, असं म्हणत काँग्रेसनं आरोप केले आहेत. 

covid second phasegas cyclenderkarnatakaoxygen