मोदी सरकारचं नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी

8 व्या वेतना आयोगालाही केंद्र सरकारने मंजुरी दिल्याची माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नवी दिल्ली : मोदी सरकारनं नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मोदी सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या (8 th Pay Commision) स्थापनेला मान्यता दिली आहे.त्यामुळे, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून या वेतन आयोगाची प्रतीक्षा होती. आता आगामी बजेटपूर्वी मोदी सरकारनं हा निर्णय घेत त्यांची प्रलंबित मागणी पूर्ण केली आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हा आयोग 2026 पर्यंत स्थापन केला जाईल.

वेतन आयोग दर दहा वर्षांनी लागू केला जातो. यापूर्वी २०१६ मध्ये वेतन आयोग लागू केला होता. सातव्या वेतन आयोगापूर्वी चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगाचा कार्यकाळ दहा दहा वर्षांचा होता. सातवा वेतन आयोग २०१६ मध्ये लागू झाला होता आणि तो डिसेंबर २०२५ मध्ये त्याचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यापूर्वीच सरकारने आठवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.

महाराष्ट्रात नवीन २१ जिल्ह्यांची निर्मितीची बातमी ‘फेक’

 

8 th Pay Commision