देशात कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, नव्या बाधितांचा आकडा तीन लाखांच्या खाली

24 तासात भारतात 2 लाख 81 हजार 386 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे

नवी दिल्ली : देशात सुरुच आहेत. कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात तीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. कालच्या दिवसात 2 लाख 81 हजार 386 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 106 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.

गेल्या आठवड्यात 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या सातत्याने चार लाखांचा टप्पा ओलांडताना दिसत होती. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार सुरुच आहेत. गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 81 हजार 386 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 106 रुग्णांना प्राण गमवावे लागले. दिलासादायक बाब ही, की कालच्या दिवसात देशात 3 लाख 78 हजार 741 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 49 लाख 65 हजार 463 वर गेला आहे. आतापर्यंत 2 लाख 74 हजार 390 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. देशात 2 कोटी 11 लाख 74 हजार 76 रुग्ण बरे झाले आहेत. तर 35 लाख 16 हजार 997 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 18 कोटी 29 लाख 26 हजार 460 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कालच्या दिवसात 6 लाख 91 हजार 211 जणांना लसीकरण करण्यात आले.

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,81,386

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,78,741

देशात 24 तासात मृत्यू – 4,106

एकूण रूग्ण – 2,49,65,463

एकूण डिस्चार्ज – 2,11,74,076

एकूण मृत्यू – 2,74,390

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 35,16,997

कालच्या दिवसात लसीकरण – 6,91,211