यंदा गच्चीवर ‘नो 31 st पार्टी’, न्यू इयर पार्टीला बंदी

  • नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गच्चीवर पार्टी करण्याचा विचार करत असाल तर सावधान!
  • पोलिसांची तुमच्यावर हे रस्त्यावर तैनात असून ड्रोनच्या माध्यमातूनही सगळ्यांवर पहारा ठेवला जाणार आहे.
  • 31 डिसेंबरच्या रात्री सुरक्षेसाठी सुमारे 31 हजार पोलिस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 28 डिसेंबर :- कोरोनाच्या संकटामुळे यंदा 31 डिसेंबरच्या रात्री सार्वजनिक ठिकाणी जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे आता अनेकांनी घरीच थर्टी फर्स्टचे सेलिब्रेशन करायचे ठरवले आहे. मात्र, आता या पार्ट्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होते की नाही, यावर पोलिसांकडून नजर ठेवली जाणार आहे.

नव्या वर्षाच्या स्वागतासाठी गच्चीवर पार्टी करण्याचा विचार करत असाल तर सावधान. कारण गच्चीवरही तुम्हाला पार्टी करता येणार नाही. ३५ हजार पोलीस अशा पार्टींवर नजर ठेवणार आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेले मुंबई पोलीसही यंदा विशेष सतर्क असणार आहेत. हे पण वाचा:- new coronavirus strain: संशयित रुग्णांची संख्या 5, नागपुरातून चिंताजनक बातमी

एरवी 31 डिसेंबर म्हटलं की मुंबईतील पब, बार आणि रेस्टॉरंटसमध्ये उत्सवाचे वातावरण असते. मात्र, यंदा नाईट कर्फ्यूमुळे या पार्ट्या अकराच्या आतच आटपाव्या लागणार आहेत. रात्री अकरानंतर पब्ज आणि डिस्को बंद असतील.

नाईट कर्फ्यूच्या आदेशानुसार, पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येणावर बंदी आहे. लोक त्यांच्या कुटुंबासोबत बाहेर पडले आणि चार किंवा त्यापेक्षा कमी जण असतील, तर काही अडचण नाही असे नागरे पाटील म्हणाले. निर्बंध असले तरी, मुंबईकरांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू, गोराई आणि मढ या ठिकाणी संध्याकाळपासून जाऊ शकतात. पण छोट्या गटाने, चारपेक्षा कमी लोक असले पाहिजेत. पोलीस या ठिकाणी गर्दी जमू देणार नाहीत, असे पोलीस सहआयुक्त (कायदा-सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील म्हणाले आहेत.

covid 19New year partyno party in night