लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वृत्तसंस्था : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २०२२ मधील पद्म पुरस्कारांची यादी जाहीर करण्यात आली असून देशभरातून १२८ जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ज्येष्ठ शास्त्रीय गायिका डॉ.प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहिर झाला आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ गायिका सुलोचना दीदी आणि बॉलिवूड गायक सोनू निगम यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच जनरल बीपीन रावत, कल्याण सिंह आणि राधेशाम खेमका यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
तसेच राधेशाम खेमका आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. तर सायरस पुनावाला आणि नटराजन चंद्रशेखर यांना पद्मभूषण पुरस्कार सन्मानित करण्यात आलं आहे. असे एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. याशिवाय नीरज चोप्रा यांना पद्मश्री, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना जाहीर करण्यात आला आहे.
पद्म पुरस्कार जाहीर
पद्मविभूषण
प्रभा अत्रे
राधेशाम खेमका (मरणोत्तर)
बिपीन रावत (मरणोत्तर)
कल्याण सिंग (मरणोत्तर)
पद्मभूषण
सायरस पुनावाला
नटराजन चंद्रशेखरन
पद्मश्री
विजयकुमार डोंगरे
डॉ. हिम्मतराव बावस्कर
सुलोचना चव्हाण
सोनू निगम
अनिल राजवंशी
बालाजी तांबे (मरणोत्तर)
भिमसेन सिंगल
हे देखील वाचा :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा