पहिली ते अकरावी सगळेच पास!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 13 मार्च: देशभरात अनेक भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालय ऑनलाईन घेण्यात आली. काही भागात विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाइन झाल्या. पद्दुचेरी मध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता अकरावी अशा सर्वच विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पद्दुचेरी चा राज्यपालांनी मान्यता दिली आहे. पद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदर राजन यांनी पद्दुचेरी प्रशासनाकडून पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर उठल्यामुळे पुद्दुचेरी च्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे.

काही दिवसांपूर्वी तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी राज्यातील ९ वी, १० वी आणि ११ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. सहामाही आणि तिमाही परीक्षांंमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणाच्या आधारे त्यांना गुण देऊन पास केले जाणार आहे. यावेळी दहावीच्या विद्यार्थ्यांना थेट पास करणे चुकीचे ठरेल अशी टीका देखील करण्यात आली होती.