पेट्रोल-डिझेल दरात पुन्हा वाढ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, 18 जानेवारी: 1 जानेवारीपासून आतापर्यंत पेट्रोलच्या भावात प्रति लिटर 1.24 रुपये वाढ झाली असून, डिझेलचा दर 1.26 रुपयांनी वाढला आहे. नवीन वर्षात आतापर्यंत पाच वेळा पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत.

दिल्लीत आज 18 जानेवारी रोजी पेट्रोल-डिझेलचा दर वधारला आहे. पेट्रोलचा दर रविवारी 84.70 रुपये होता, तो आज 84.95 रुपये प्रति लिटर झाला आहे. म्हणजेच लिटरमागे 25 पैसे वाढ झाली आहे. डिझेलचा दर रविवारी 74.88 रुपये होता, तो आज 75.13 रुपये प्रती लिटर झाला आहे. म्हणजेच डिझेलही लिटरमागे 25 पैशांनी महागले आहे.

मुंबईत पेट्रोलचा दर 24 पैशांनी वाढून 91.56 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा भाव लिटरमागे 27 पैशांनी वाढून 81.87 रुपये प्रति लिटर झाला आहे.

कोलकात्यात पेट्रोलचा भाव लिटरला 24 पैशांनी वाढून 86.39 रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेलचा भाव 25 पैशांनी वाढून 78.72 रुपये प्रति लिटर आहे.

चेन्नईत पेट्रोलचा दर 23 पैशांनी वधारून प्रती लिटर 87.36 रुपये झाला आहे, तर डिझेलच्या दरात 24 पैसे प्रती लिटर वाढ होऊन तो 80.43 रुपये प्रती लिटर झाला आहे.

बेंगळूरूमध्ये पेट्रोलचा दर 26 पैशांनी वधारून प्रति लिटर 87.82 रुपये आहे, तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 27 पैसे वाढ होऊन तो 79.67 रुपये प्रति लिटर झाला आहे.