Petrol-Diesel:-पेट्रोल शंभरी पार तर डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर

देशात आज पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 33 पैशांनी महागलं आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क 29 मे :- मे महिन्यात 15 व्या वेळा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. शनिवारी देशभरात पेट्रोलची किंमत 25 पैशांची तर डिझेलच्या किंमतीत जवळपास 33 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलची विक्री 100 रुपयांवर होत असलेली मुंबई ही देशातील पहिली मेट्रो सिटी बनली आहे. परभणीत सर्वाधिक म्हणजे 102.57 रुपयांने पेट्रोलची विक्री होत असून डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे.

महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशसह अन्य काही शहरांमध्ये पेट्रोलनं 100 रुपये प्रति लिटरचा आकडा आधीच पार केला आहे. मुंबईत पेट्रोल आज 100.19 रुपये आणि डिझेल 92.17 रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीमध्ये आज पेट्रोलची किंमत 93.94 रुपये तर डिझेल 84.89 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 93.97 रुपये आणि डिझेल 87.74 रुपये आणि चेन्नईमध्ये पेट्रोल 95.51 रुपये आणि डिझेल 89.65 रुपये प्रति लिटर आहे.

परभणी जिल्ह्यात आज पुन्हा इंधनाचे दर वाढले असून पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 33 पैशांनी महागले आहे. परभणीत पेट्रोलची किंमत 102. 57 रुपये असून डिझेलची किंमत 93.05 रुपयांवर पोहोचली आहे. पेट्रोलपाठोपाठ डिझेलचीही शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्यप्रदेशसह अन्य काही शहरांमध्ये पेट्रोलनं 100 रुपये प्रति लिटरचा आकडा आधीच पार केला आहे.

Commna manfeul price highPetrol cross 100petrol desel price high