लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 11 मे : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींची शंभरीकडे वाटचाल सुरु झाल्याचं दिसून येतंय. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 26 पैशांनी वाढून ती 98.12 रुपयांवर पोहोचली आहे तर डिझेलची किंमत 31 पैशांनी वाढून ती 90 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 27 पैशांची वाढ झाली असून ते 92 रुपयांवर पोहोचलं आहे तर डिझेलच्या किंमतीत 30 पैशांनी वाढ होऊन ते 82.36 रुपयांवर पोहोचलं आहे. पुण्यामध्ये पेट्रोलची आजची किंमत 98 रुपये तर डिझेलची किंमत 87.92 रुपये इतकी आहे.
अमेरिकेची सर्वात मोठी इंधन पाईपलाईन Colonial Pipeline वर सायबर हल्ला झालाय. देशाच्या पूर्व किनारपट्टीसाठी 45% डिझेल, पेट्रोल आणि जेट इंधनाचा पुरवठा या पाईपलाईनद्वारे होतो. 8850 किमी लांबीची ही पाईपलाईन दररोज 25 लाख बॅरल इंधन पुरवते. शुक्रवारी झालेल्या सायबर हल्ल्यानंतर इंधन पाईपलाईन ऑपरेटर Colonial Pipeline ने आपले सर्व नेटवर्क बंद केले आणि सेवा पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे जगभरात तेलाच्या किमतीत वाढ होऊ शकते.
या दोन महिन्याच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या असूनही देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली नव्हती. यामागे पाच राज्यातील निवडणुका हे कारण असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र जशा या निवडणुका संपल्या तसं लगेचच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली.
देशातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर
मुंबई
पेट्रोल- 98.12 रुपये/लिटर
डिझेल- 89.48 रुपये/लिटर
दिल्ली
पेट्रोल- 91.80 रुपये/लिटर
डिझेल- 82.36 रुपये/लिटर
कोलकाता
पेट्रोल- 91.92 रुपये/लिटर
डिझेल- 85.20 रुपये/लिटर
चेन्नई
पेट्रोल- 93.62 रुपये/लिटर
डिझेल- 87.25 रुपये/लिटर
[हे पण वाचा :- तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या दोन महिला ठरल्या वाघाच्या बळी ]
हे देखील वाचा :
म्युकरमायकोसीसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनारोग्य योजनेतून मोफत उपचार – आरोग्यमंत्री राजेश टोपे