कच्च्या तेलाची किंमत घसरली तरी पेट्रोल-डिझेलचे दर कायम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 29, ऑक्टोबर :-  एक महिन्यापूर्वी उंची गाठलेल्या कच्च्या तेलाच्या किमती आताा घरसल्या आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत सलग दुसर्या दिवशी ही घरण झाली आहे. मात्र देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दर जैसे थे आहे. दरम्यान घसरणी नंतर ही क्रूडची किंमत प्रति बॅरल 90 च्या वरच आहे.

देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांपासून अधिक काळ समान पातळीवर आहेत. शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 87.46 वर घरल्याचे दिसले. त्याच वेळी ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 95.29 पर्यंत घरसले. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमती वाढल्या आहेत.

ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये कच्चे तेल विक्रमी पातळीवर आले. पण त्यावेळी ही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला दिसला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी सरकार ने उत्पादन शुल्क कमी केले होते. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले. यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या.

हे देखील वाचा :-

Petrol Dieselprices