कोरोना संकटात बल्लारपूरातील रेल्वे कर्मचारी कर्तव्यनिष्ट!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

बल्लारपूर प्रतिनिधी – राजू वानखेडे

बल्लारपूर, दि. २९ एप्रिल: देशात कोरोनाच्या संसर्गाने रोज नव-नवीन आकडे समोर येत आहे. दिवसेंदिवस कोरोना संसर्ग झपाट्याने वाढतच आहे. त्यामुळे रेल्वे कर्मचारी कर्तव्यनिष्ठ असतांना त्यांनाही कोरोना संसर्गाने ग्रासले आहे. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडत असल्याने विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती रेल्वे स्टेशन मध्ये कर्तव्य बजावितांना दिसून येत आहे.

देशभरातून कोरोनाचे संसर्ग वाढत असल्याने विविध राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे नोकरदार वर्गासह मजूर वर्गही आपल्या स्वगावी वापस येत आहे. त्यावेळी त्यांचे माहिती संकलित करणे याशिवाय रेल्वे स्टेशनवर कर्तव्यावर असलेल्या आरोग्य विभागाकडून येणाऱ्या प्रवाशांचे आरटीपीसीआर, होम क्वारंटाईन तसेच इतर आजाराच्या लक्षणाची माहिती संग्रहित करून पुढील प्रशासनाला माहिती देण्यात येत आहे. यासाठी विविध विभागाचे कर्मचारी कोरोनाच्या संकटसमयी आपले कर्तव्य तत्पर आणि चोखपणे बजावत आहेत.

विशेष करून कोरोना संसर्गाची भीती असतांनाही बल्लारपूर येथिल तहसीलदार यांचे आदेशाने आर. के. वानखेडे, एस. एम. चौव्हान, एस. डी. गौरकार, डी. एल. कुबडे, विजय खोब्रागडे, सुभाष जुनघरे, रेल्वे विभागाचे कर्मचारी नईम बेग, प्रधान तिकीट परीक्षक, पी. आर. विश्वकर्मा, प्रधान तिकीट परीक्षक, रमेशकुमार, ओमप्रकाश, वरिष्ठ तिकीट परीक्षक तसेच रेल्वे पोलीस बल आदि कर्मचारी एकनिष्ठाने कर्तव्य बजावीत आहे.

Railway Staff