पेट्रोल डिझेलमध्ये पुन्हा वाढ.. जाणून घ्या आजची किंमत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, दि. १८ मे : पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीनी सर्वसामान्यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा दोन्ही इंधनांच्या किंमतीत मोठी वाढ केली आहे. पेट्रोल प्रति लिटर 24 ते 27 पैसे वाढली असतांना डिझेलही 27 ते 31 पैशांनी महागले. निवडणुकीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढतच आहेत. निवडणुकीनंतर पेट्रोल 11 दिवसांत प्रतिलिटर 2.50 पैसे महाग झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ झाल्याने देशातील अनेक शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या वर पोचले आहेत. इंदूर, भोपाळ आणि जयपूरसह अनेक शहरांमध्ये दर 100 रुपयांच्या जवळ आहेत. या 11 दिवसांत पेट्रोल 2.50 रुपयांनी तर डिझेल 2.78 रुपयांनी महागले आहे.

दिल्लीत पेट्रोल 92.85 रुपये तर डिझेल प्रति लिटर 83.51 रुपये आहे.

मुंबईत पेट्रोल 99.14 रुपये तर डिझेल प्रति लिटर 90.71 रुपये आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल 94.54 रुपये तर डिझेल 88.34 रुपये प्रति लिटर आहे.

कोलकातामध्ये पेट्रोल 92.92 रुपये आणि डिझेल 86.35 रुपये प्रति लिटर आहे.

lead storyPetrol Diesel