रुपाली चाकणकर यांनी EVM मशीनची केली पूजा; निवडणूक अधिकाऱ्यानेच दाखल केला गुन्हा  

बारामती लोकसभा मतदारसंघ सकाळपासून मोठं-मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या अजित पवार यांचा ‘मेरे पास माँ है’ हा डायलॉग गाजला. तर सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी गेल्या. राजकीय वातावरण अशा प्रकारे ढवळून निघत असतानाच आता evm ची पूजा केल्याने पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी  मतदान सुरु होण्यापूर्वी त्या “औक्षण” करण्यासाठी ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल होताच मतदान केंद्रावरील अधिकारी चाकणकरांनी ईव्हीएमची पूजा करताच अधिकारी अचानक झालेल्या या प्रकाराने चक्रावले. अशाप्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने अधिकाऱ्यानेच याप्रकरणी तक्रार दिली. EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वृतसंस्था दि ७राज्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने नवीन वाद ओढावून घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्यानेच त्यांच्या विरोधात तक्रार दिली. त्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर हे प्रकरण शेकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या खडकवासाला परिसरातील एका मतदान केंद्रावर पोहचल्या. मतदान सुरु होण्यापूर्वी त्या “औक्षण” करण्याचे ताट घेऊन मतदान केंद्रात दाखल झाल्या. त्यांनी ताटात दिवा पण ठेवलेला होता. त्यानंतर त्यांनी मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने त्यानंतर चाकणकरांनी ईव्हीएमची पूजा करताच अधिकारी अचानक झालेल्या या प्रकाराने चक्रावले. अशाप्रकारे मतदान केंद्रात जाऊन पूजा करणे हे निवडणूक आयोगाच्या नियमात बसत नसल्याने अधिकाऱ्यानेच याप्रकरणी तक्रार दिली.

EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी महिला महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुणे पोलिसांनकडून गुन्हा दाखल करण्यात आला. पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये रूपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात एकच चर्चा रंगली आहे.

ईव्हीएम मशीनची पूजा करतानाचा रुपाली चाकणकर यांचा फोटो राज्यभर एकदम व्हायरल झाला असून समाज माध्यमावर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. तिसऱ्या टप्प्यात अजित दादांचा डायलॉग, सुप्रिया सुळे यांचे अजित दादांच्या घरी जाणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची ईव्हीएम पूजा यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असला तरी जबादार व्यक्तीने असे प्रकार करणे किती सयुक्तिक असून पुरोगामी महाराष्ट्रात चालले तरी काय असा सवाल सामान्य नागरिक करताना दिसून येत आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवारखा. सुप्रिया सुळेनिवडणूक अधिकारीराज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर
Comments (0)
Add Comment