जेष्ठ साहित्यक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांना मुक्तिपथकडून भावपूर्ण श्रद्धांजली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. २७ जानेवारी : ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवचट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून मुक्तिपथ व गडचिरोली जिल्ह्याच्या जनतेसाठी ही अतिशय दुख:द बातमी आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांच्या निधनावर मुक्तिपथने शोक व्यक्त केला आहे. “गडचिरोली जिल्ह्यात जेंव्हा दारूबंदी आंदोलन सुरु होते त्यावेळी त्यांनी १९९२ मध्ये गडचिरोली येथे येऊन, आंदोलनाला समर्थन दिले. १८ फेब्रुवारी १९९४ ला सर्च द्वारा गडचिरोली जिल्ह्यातील पहिले व्यसनमुक्ती केंद्र सरू झाले, यात त्यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. सर्च द्वारा गावात सुरु केलेल्या निवासी गांवपातळी व्यसनमुक्तिच्या शिबिराच्या उद्घाटनाला ते आले होते. अनिल अवचट यांच्या निधनाने व्यसनमुक्ती क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून, एक मोठा व्यक्ती हरवला आहे.”

या दुख:द प्रसंगी गडचिरोली जिल्ह्यात दारू व तंबाखूमुक्ती करिता सुरु असलेल्या मुक्तिपथ अभियाना मधील जिल्हा, तालुका पातळीचे कार्यकर्ते, गावात असलेल्या दारूबंदीच्या गांवसंघटना आणि गडचिरोली जिल्ह्यातील जनतांनी अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

हे देखील वाचा : 

भीषण अपघात : ट्रक्टर व कारच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर

धक्कादायक! धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झेंड्यासमोरचं अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न..

 

 

lead newsMuktipath