द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी निधन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नरसिंगपूर ( मध्य प्रदेश ), 11, सप्टेंबर :-  द्वारका आणि शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे रविवारी निधन झाले. ते 99 वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती हे हिंदूंचे सर्वात मोठे धार्मिक नेते मानले जात होते. काही दिवसांपूर्वी स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांचा 99 वा वाढदिवस साजरा केला, ज्यामध्ये खासदार शिवराज सिंह चौहान यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली.

शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचा गंगा आश्रम नरसिंहपूर जिल्ह्यातील झोटेश्वर येथे आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. स्वरूपानंद सरस्वती यांचा जन्म २ सप्टेंबर १९२४ रोजी मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील दिघोरी गावात झाला. 1982 मध्ये ते गुजरातमधील द्वारका शारदा पीठ आणि बद्रीनाथ येथील ज्योतिर मठाचे शंकराचार्य बनले.

शंकराचार्य सरस्वती यांच्या पालकांनी त्यांचे बालपणी पोथीराम उपाध्याय असे नाव ठेवले होते. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्माकडे वळले. त्यांनी वेद-वेदांग आणि शास्त्रांचे शिक्षण काशी (उत्तर प्रदेश) येथे घेतले होते.

स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनीही स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यानी 15 महिने तुरुंगवास भोगला. सरस्वती यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 9 महिने आणि मध्य प्रदेशात 6 महिने तुरुंगात काढले होते.

हे देखील वाचा :-

शिवसैनिक हेच शिवसेनेचं ब्रम्हास्त्र !

Madhyapradeshnarsinghpoorswami swaroopananad sarswati