लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अमृतसर, 04 नोव्हेंबर :- पंजाबच्या अमृतसर येथून आज खळबळजनक घटना समोर येत आहे. शिवसेना पदाधिकारी सुधीर सुरी यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. गर्दीचा फायदा घेत हमलेखोर घटनास्थळावरून पसार झाले आहे. जख्मी अवस्थेत सुधीर सुरी यांना तात्काळ रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गोपाल मंदिर परिसरात कचराकुंडी जवळ देवदेवत्यांच्या मुर्त्या आढळल्याच्या निषेधार्थ सुधीर सुरी यांनी मंदिराबाहेर आंदोलन सुरू केले होते. मंदिराबाहेर त्यांचे आंदोलन सुरू असतांनाच अज्ञात हमलेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
सुरी यांच्यावर बंदूकीने गोळ्या झाडण्यात आल्या. गोळीबारानंतर गर्दीचा फायदा घेत हल्लेखोरांनी घटनस्थळावरून पळ काढला. यामुळे आंदोलनस्थळावर एकच गोंधळ उडाला. गोळ्या लागताच सुधीरसुरी जमीनीवर कोसळले. कार्यकर्त्यानी त्यांना तातडीने रूग्णालयात नेले. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून नाकाबंदी केली आहे. पोलिसांचा विशेष पथक आरोपिंचा शोध घेण्यास रवाना झाला आहे. यापूर्वी देखील सुधीर सुरी यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. एका टोळ्याने सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करण्याचा कट रचला होता. मात्र, हल्ल्याच्या आधीच पोलिसांनी आरोपिंना अटक केली होती. त्यामुळे सुधीर सुरी यांच्यावरील हल्ल्याचा कट फसला होता.
हे पण वाचा :-