लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
वृत्तसंस्था, २६ नोव्हेंबर: मध्य प्रदेशातील दमोह येथील तेंदुखेडा येथे एका आईनं आपल्या ४० दिवसांच्या चिमुरड्याची दोरीनं गळा आवळून हत्या केल्याची हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुलाची हत्या केल्यानंतर आईनंच त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. जेणेकरून कोणाला संशय येऊ नये. पण पोलिसांना मुलाच्या मृत्यूचा संशय आला. त्यानंतर बाळाचं शवविच्छेदन करण्यात आले. यात चिमुरड्याचा मृत्यू गळा दाबल्यानं झाल्याचं अहवालात समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी आईची कसून चौकशी केली असता आईनं मुलाच्या हत्येची कबुली दिली.
त्यानंतर आरोपी अल्पवयीन आईला बुधवारी बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. अल्पवयीन मुलीचं वय १५ वर्षे आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला होता. त्यानंतर तिनं एका मुलाला जन्म दिला होता.
बलात्कारातला आरोपीही अल्पवयीन
मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीवर १७ वर्षीय तरुणाने बलात्कार केला होता. दोघंही एकाच गावचे रहिवासी आहेत. काही वर्षांपूर्वी दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर दोघांमधील संवाद वाढू लागला. काही दिवसात त्याची भेट होऊ लागली. यादरम्यान तरुणानं मुलीवर बलात्कार केला होती. मुलगी गरोदर राहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. नातेवाईकांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
जानेवारीमध्ये अल्पवयीन मुलीवर झाला होता बलात्कार
प्राप्त माहितीनुसार, जानेवारी २०२१ रोजी एका १५ वर्षांच्या मुलीवर एका किशोरवयीन मुलानं बलात्कार केला होता. ऑगस्टमध्ये मुलगी गरोदर असल्याचं तिच्या कुटुंबीयांना समजलं. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. आरोपीला अटक करून बालसुधारगृहात पाठवण्यात आलं. त्यानंतर १६ ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात अल्पवयीन मुलीनं एका गोंडस मुलाला जन्म दिला.
मुलीचं वय कमी असल्यानं मुलाला जन्म दिल्यानंतर तिची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे बाळ आणि आई २२ दिवस रुग्णालयात होते. बरी झाल्यानंतर ती तिच्या गावी गेली.
अल्पवयीन आईला महिला सुधारगृहात पाठवलं
१० नोव्हेंबरच्या रात्री अल्पवयीन आई आपल्या बाळाला घेऊन तेंदुखेडा रुग्णालयात पोहोचली. मुलाची तपासणी केली असता बालकाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न झाले. पोलिसांना संशय आल्यानं पोलिसांनी बाळाचे पोस्टमॉर्टम केलं. त्यानंतर बाळाचा मृत्यू दोरीनं गळा दाबल्याने झाल्याचे समोर आलं.
पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असता आईनं आपल्याच मुलाची हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी तिच्याविरुद्ध कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला बाल न्यायालयात हजर केलं, तेथून तिची रवानगी महिला सुधारगृहात करण्यात आली आहे.
हे देखील वाचा :
केंद्र सरकार नवं विधेयक मांडणार… इंधन दरवाढीनंतर आता वीजबिलंही महागणार?
भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांसाठी २१ डिसेंबरला होणार मतदान
शालेय विद्यार्थ्यांनी रॅली मार्फत मतदारांमध्ये मतदानविषयक केली जनजागृती