टेक ऑफच्या दरम्यान इंजिन मधून निघाले स्पार्क

इंडिगो विमानाचे केले इमर्जन्सी लॅंडिंग, सर्व प्रवासी सुखरूप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नवी दिल्ली, 29, ऑक्टोबर :- दिल्ली येथून बेंगळूरला जाणार्या इंडिगो विमानाचे टेक ऑफच्या दरम्यान इंजिन मधून स्पार्क निघाल्याने इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले. उड्डाण सुरू असतानाच विमानातून स्पार्क निघत असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आल्यामुळे तातडीने विमान थांबवावे लागले. इंडिगो ने जारी केलेल्या निवेदनात याबद्दलची माहिती दिली आहे. सध्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. हे विमान परत कधी उड्डाण करेल याबाबत अद्यापही काही माहिती देण्यात नाही आली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. त्या व्हिडीओमध्ये विमान टेक ऑफ करण्यासाठी धावपट्टीवर धावत असतांना अचानक एक ठिणगी उठते आणि त्यानंतर आगीच्या ज्वाळांना सुरवात होते. हे पाहताच पायलट धावपट्टीवरच विमान थांबवतो आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले जाते.

गेल्या काही महिन्यांत देशात अनेक वेळा विमानांचे इमर्जन्सी लॅंडिंग झाले आहे. बहुतेक घटना स्पाइसजेट सोबत घडल्या आहेत. पण आता इंडिगो आणि एअर इंडियाच्या विमानांमध्ये ही तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे. अपघात झालेल्या विमानाचा क्रमांक 6E-2131 आहे. जारी केलेल्या निवेदनात, विमान कंपनीने म्हटले आहे की तात्रिक बिघाडामुळे विमान थांबवावे लागले. सध्या विमान कंपनीकडून प्रवाशांसाठी दुसर्या विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे. इंडिगो ने या घटनेबद्दल प्रवाशांची माफी मागितली आहे.

हे देखील वाचा :-

emergencyIndiGolandingplane