रोहित शर्मा सह स्टार खेळाडूं सरावासाठी उतरले मैदानात

सराव सत्रात टीम इंडियाचा जबरदस्त सराव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

टी-20, 25 ऑक्टोबर :- भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट राखून धुव्वाधार पराभव केला. त्यानंतर भारतीय संघ गुरूवारी 27 ऑक्टोबरला सिडनीमध्ये नेदरलॅंड विरूध्द आपला दुसरा सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ सिडनीत दाखल झाला आहे. नेदरलॅंड विरूध्द खेळल्या जाणार्या सामन्यापूर्व मंगळवारी 25 ऑक्टोबरला पहिल्या सराव सत्रात टीम इंडियाने जबरदस्त सराव केला.

या सराव सत्रादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि सलामीवीर केएल राहुल लयबध्द दिखले. विशेष म्हणजे, पाकिस्तानविरूध्द खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात दोन्ही सलामीवीर अपयशी ठरले. पाकिस्तानविरूध्द विजयाचा शिल्पकार ठरलेल्या भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली जबरदस्त फाॅर्ममध्ये दिसला. सराव सत्रादरम्यान भारतीय फलंदाजांसह गोलंदाज मैदानात घाम गाळतांना दिसले. दिनेश कार्तिक आणि केएल राहुल यांनी भारतीय फिरकीपटू आर. अश्विन आणि युझवेंद्र चहलचा गोलंदाजीवर सराव केला. यावेळी ऋषभ पंतही सराव करतांना दिसला. हे संपूर्ण सराव सत्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या देखरेखीखाली पार पडले. नेदरलॅंड विरूध्द सामान्यापूर्वी सराव सत्रात सुर्यकुमार यादव आणि ऑलराउंडर हार्दिक पांड्या दिसला नाही. यासह भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंह यांनी देखील विश्रांती घेतली.

भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराम, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर.

नेदरलॅंड संघ

स्काॅट एडवड्र्स (कर्णधार), काॅलिन एकरमॅन, शारिज अहमद, लोगान वॅन बीक, टाॅम कूपर, ब्रॅंडन ग्लोवर, टिम वॅन डेर गुगटेन, फ्रेड क्लासेन, बास डी लीडे, पाॅल वॅन मीकेरेन, रोएलोफ वॅन डेर मेर्वे, स्टीफन मायबर्ग, तेजा निदामानुरू, मॅक्स ओडाॅड, टीम प्रिंगल, विक्रम सिंह.

हे पण वाचा :-

practiceStar players