इस्त्रोच्या राॅकेट LVM-3 चे यशस्वी प्रक्षेपण

इस्त्रों ने ग्लोबल कमर्शियल लाॅन्च सव्र्हिस मार्केमध्ये नोंदविला आपला प्रवेश, इस्त्रोची देशाला दिवाळी भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

श्रीहरीकोटा, 23 ऑक्टोबर :-  भारतीय अंतराळ संस्था इस्त्रो ने देशाला दिवाळीची विशेष भेट दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रो ने आपल्य सर्वात वजनदार राॅकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केले. इस्त्रो चे राॅकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारताने ग्लोबल कमर्शियल लाॅन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे.

इस्त्रो ने आज नव्याने दमदार कामगिरी केली आहे. इस्त्रोच्या राॅकेट LVM-3 चे यशस्वी प्रक्षेपण पार पडल. या प्रक्षेपणासह, इस्त्रो ने सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. 36 उपग्रह प्रक्षेपणाच्या या मिशनसाठी इस्त्रो ने आपले सर्वात वजनदार राॅकेट LVM-3 म्हणेज लाॅंच व्हेईकल मार्क 3 आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केले.

या मिशनमध्ये ब्रिटिश स्टार्टअप वनवेबचे 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. वनवेब ही एक खाजगी उपग्रह संपर्क कंपनी आहे. इस्त्रो ने ग्लोबल कमर्शियल लाॅन्च सव्र्हिस मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदविला आहे. वनवेबही एक खासगी उपग्रह प्रक्षेपित करणारी कंपनी आहे. भारती एंटरप्राईजेज एक प्रमुख गुंतवणूक आणि भागीदार असलेली कंपनी आहे. रविवारी 43.5 मीटर उंच राॅकेट सतीश धवन अंतराळ केंद्रातुन मध्यरात्री 12 वाजून 7 मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले. या राॅकेटची क्षमता 8,000 किलोग्राम इतकी आहे.

हे मिशन इस्त्रोसाठी महत्वाचे होते. कारण व्यावसायिक क्षेत्रात हे पहिले मिशन होते आणि प्रक्षेपण यान सोबत एनएसआईएलची ही पहिलीच मोहिम होती. वनवेबच्या 5,796 किलोग्राम वनाच्या 36 उपग्रहांसोबत अंतराळात जाणारे पहिले भारतीय राॅकेट बनले आहे.

हे पण वाचा :-

अनुदान उपलब्‍ध होण्‍याची वाट न पाहता तात्‍काळ दावा मंजूर 

आदिवासी पाड्यात शंभर रुपयाच्या रेशन किटचा काळाबाजार

launchrocket LVM-3Successful