मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या ४३ मंत्र्यांनी पद आणि गोपनियतेची घेतली शपथ; जाणून घ्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आज सायंकाळी 6 वाजता राष्ट्रपती भवनात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. 43 मंत्र्यांच्या यादीत नारायण राणे यांचं नाव सर्वात वर होतं. त्यामुळे त्यांनी पहिली शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सर्वच केंद्रीय मंत्री उपस्थित होते.

सर्वात आधी राणेंची शपथ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा सभागृहात प्रवेश झाल्यावर शपथविधीला सुरुवात झाली. राष्ट्रपतींनी सर्वात आधी राणेंना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे राणेंना केंद्रात मोठं मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शपथ घेणारे मंत्री
नारायण राणे
सर्बानंद सोनोवाल
डॉ. विरेंद्र कुमार
ज्योतिरादित्य सिंधिया
रामचंद्र प्रसाद सिंग
अश्विनी वैष्णव
पशुपती कुमार पारस
किरेन रिजीजू
राजकुमार सिंह
हरदीप सिंह पुरी
मनसुख मंडाविया
भुपेन्द्र यादव
पुरुषोत्तम रुपाला
जी. किशन रेड्डी
अनुराग सिंह ठाकूर
अनुप्रिया सिंह पटेल
डॉ. सत्यपाल सिंह बघेल
राजीव चंद्रशेखर
शोभा करंडलाजे
भानूप्रताप सिंग वर्मा
दर्शना विक्रम जरदोष
मीनाक्षी लेखी
अनपुर्णा देवी
ए. नारायण स्वामी
कौशल किशोर
अजय भट्ट
बी. एल. वर्मा
अजय कुमार
चौहान देवूसिंह
भागवत खुपा
कपिल पाटील
प्रतिमा भौमिक
डॉ. सुभाष सरकार
डॉ. भागवत कराड
डॉ. राजकुमार सिंह
डॉ. भारती पवार
बिस्वेश्वर तडू
शंतनु ठाकूर
डॉ. मुंजपारा महेंद्रभाई
जॉन बरला
डॉ. एल. मुरगन
निसित प्रमाणिक

 

हे देखील वाचा :

राज्यात जूनमध्ये १५ हजार ३३६ बेरोजगारांना रोजगार; कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीबाबतचा प्रस्ताव तातडीने केंद्र शासनाकडे पाठविण्यात यावा – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

शासनाची क्षेत्रीय स्तरावरील महत्वाची कार्यकारी पदे तातडीने भरण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश