महिलेने मोडला कोविडचा नियम पोलिसांनी दंड म्हणून केले “किस”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. १९ फेब्रुवारी:- महिलेने नियम मोडला म्हणून पोलिसांनी तिला दंड आकारण्या ऐवजी तिचे चुंबन घेतल्याची घटना घडली आहे. या पोलिसाला निलंबित करण्यात आले आहे.

हे प्रकरण पेरू देशातील आहे. येथील एका टिव्ही चैनलने या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज वायरल केले आहे. या व्हिडिओत असे दिसते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेले निर्बंध एक महिला तोडते. त्यामुळे पोलीस तिला अडवितो. पोलिसाच्या हातात महिलेची माहिती लिहिण्यासाठी नोटपॅड या व्हिडिओ मध्ये दिसत आहे.

महिला त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या अत्यंत जवळ येते . पोलीस तिला दंड करणार असतो मात्र ती जवळ येताच तिला दंड करण्या ऐवजी मास्क काढतो आणि तिचे चुंबन घेतो.  महिला हि त्याला प्रतिसाद देते.

हा विडीओ व्हायरल झाल्यानंतर या संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचं नाव उघड होऊ शकले नसले तरी त्यांची आजवरची कारकीर्द स्वच्छ असल्याची माहिती मिळत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हे प्रकरण समजतात आम्ही या पोलिसाला निलंबित करण्याचा निर्णय घेतला. या फूटेजमध्ये दिसणारी महिलाही सोशल डिस्टंसिंग सारख्या कोविड काळातील नियमाचं उल्लंघन करत होती. आणि तो पोलिस तिला तसं करण्याची परवानगी देत होता. तसेच आपला मास्क काढून तिचे चुंबन घेत होता. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे.