संप करताना देखील जनतेची सेवा करणे असा वैशिष्ट्यपूर्ण संप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी, दि. २८ मार्च : नायब तहसीलदार संवर्ग विभागीय स्तरावर कायम ठेवणे तसेच महसूल सहाय्यक भरती करणे या दोन प्रमुख मागण्यांसह इतर १४ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने दिनांक २१ मार्च २०२२ पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन  सुरू केले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनात एक दिवसाचा लाक्षणिक संप आज दिनांक २८ मार्च २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात आला असून महाराष्ट्रातील 100% कर्मचाऱ्यांनी सदस्य संप यशस्वी केला आहे लाक्षणिक संपाच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रक्तदान करून शासनाचा निषेध केला असून महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांनी आज रोजी जवळपास एक हजार पेक्षा जास्त रक्तपिशव्या देऊन शासनाचा निषेध केला आहे.

यातूनच महसूल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करतांना देखील महाराष्ट्रातील जनतेची सेवा केलेली आहे. असा हा अभूतपूर्व संप रक्तदान केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना सर्व जिल्हाध्यक्ष व विभागीय विभागीय अध्यक्ष यांचे आभार व्यक्त करत आहे आजच्या संपाने महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे.

हे देखील वाचा : 

जिल्ह्यात महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटर सुरु

स्थलांतरीत महिलांनी एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत आरोग्य विषयक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

 

 

lead news