लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याने ती गर्भवती झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. २६ नोव्हेंबरला सदर बाबत घोट ठाण्यात गुन्हाची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी २७ रोजी आरोपीला जेरबंद केले.
पोलिसांच्या माहितीनुसार, शरद केशव गेडेकर, वय ३५ वर्ष ( रा. निमरडटोला) असे आरोपीचे नाव आहे. पिडीत महिला ही अल्पवयीन असून पीडित मुलीचे वय १६वर्ष असून मुलीचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर तो तिच्याकडे येऊन धमकावत अत्याचार करायचा. यातून तिला गर्भधारणा झाली.
पीडितेच्या तक्रारी वरुन २६ रोजी घोट पोलिस स्टेशन मधील पोलीस मदत केंद्रात बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार (पास्को ) अंतर्गत गुन्हा नोंद झाला. २७ रोजी पोलिसांनी शरद गेडेकर या आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीस २८ रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक नीलेश गोहणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जया शेळके करीत आहेत.