वसईमध्ये आदिवासींवरील अत्याचाराची मालिका सुरूच…

कातकरी पाड्या वरील पारंपरिक वहिवाटीचा रस्ता गुंडांनी जेसीबीने खोदला... आदिवासी महिलांना अश्लील शिवीगाळ करून केली धक्काबुक्की...

 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

वसई दि २४ नोव्हेंबर – विरार पूर्वेच्या टोकरे कातकरी पाडा येथील गरीब आदिवासी कातकरी बांधवावर येथील जमिनदाराकडून अत्याचार केले जात असल्याची घटना समोर आली आहे. येथील कातकरी पाड्यावर जाण्यासाठी असलेल्या पारंपरिक वहिवाटीचा रस्ता मुजोर जमीनदाराने जेसीबीच्या सहाय्याने जबरदस्तीने खोदला. सदर रस्ता १४ वा वित्त योजनेतून ग्राम पंचायतीमार्फत केलेला असतानाही ग्रामस्थांचा विरोध डावलून आणि दमदाटी करून रस्ता खोदला. तसेच, विरोध करणाऱ्या महिलांना अश्लील शिवीगाळ करून, धक्का बुक्की करत ठार मारण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

वसई येथील आदिवासी महिलांना पोलिसांकडून निर्दयी पणे मारहाण झाल्याची घटना ताजी असताना आता, आणखी एका आदिवासी अत्याचाराची घटना समोर आली आहे. विरार पूर्वेच्या टोकरे कातकरी पाडा येथील गरीब आदिवासी कातकरी बांधवावर विकास नाईक आणि इतर ५ ते ६ गुंडांकडून कातकरी पाड्यावर जाणारा रस्ता जबरदस्तीने दामदाटी जेसीबी मशीनच्या सहायाने जबरदस्तीने खोदला. रस्ता खोदल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे . हा रस्ता पारंपरिक वहिवाटीचा असून १४ वा वित्त योजनेतून ग्राम पंचायतीमार्फत बनवण्यात आला आहे. मात्र हा सरकारी रस्ता खोदल्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी विकास नाईक व त्याच्या साथीदारांविरोधात एट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा श्रमजीवी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामचंद्र रोज यांनी दिला आहे.

हे देखील वाचा,

आदिवासी महिलांना चोर समजून पोलिसांकडून बेदम मारहाण!

निमगडे दाम्पत्यावर प्राणघातक हल्ला!

गडचिरोलीत पुन्हा वाघाच्या हल्यात महिलेचा मृत्यू !

Clead news M Uddhav Thakarey