उमेदवारीवरून अजितदादांनी पेटवले रान, मग बाकीच्यांनी काय गोट्या खेळायच्या ?

अखेरच्या टप्प्यात अजितदादांनी खेळल् मोठं कार्ड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे बारामतीचा गड जिंकण्यासाठी मैदानात उतरले आहेत. गावोगावी जात त्यांनी आपल्या तडाखेबंद भाषणांनी आणि रोखठोक स्वभावाने रंगत आणली. लोकसभेला पवार साहेबांना साथ दिली. आता मला विधानसभेत पाठवा असे आवाहन त्यांनी केले. गावोगावी जाऊन त्यांनी मतदारांना भावनिक साद घातलीच. पण त्याचवेळी अखरेच्या टप्प्यात त्यांनी युगेंद्र पवार आणि काकीवर पण निशाणा साधला. त्यांनी आता अजून एक मोठा पत्ता टाकला आहे. काही दिवसांपूर्वी रासपचे महादेव जानकर यांनी जाहीर सभेत जे वक्तव्य केले होते. तोच मुद्दा स्वत: अजितदादांनी हिरारीने मांडला आहे.

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांची चूल सध्या महायुतीच्या वाड्यात आहे. एक आठवड्यापूर्वी त्यांनी बारामती मतदारसंघातील काटेवाडी कण्हेरी येथे जोरदार भाषण केले. त्यात त्यांनी सत्ता केंद्र पवार कुटुंबियातच कसे असा सवाल केला होता. अजित पवार बाजूला झाल्यानंतर शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांना उमेदवारी दिली. त्यावर त्यांनी शरद पवार यांनी पवार सोडून इतर कुणाला का उमेदवारी दिली नाही? असा सवाल केला होता.