चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू, भंते,, आंबेडकर अनुयायींची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी अलोट गर्दी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

रायगड दि,२० मार्च : महाड तालुक्यातील चवदार तळ्यावर डॉ. बाबासाहेबांनी २० मार्च १९२७ रोजी पाण्याचा सत्याग्रह करत “‘ न भूतो न भविष्य “‘ अशी अभूतपूर्व महान क्रांती केली होती त्याला आज ९५ वर्षे पूर्ण होत आहेत.

आज दिनांक २० मार्च रोजी चवदार तळ्यावर जगप्रसिद्ध बौद्ध धर्मगुरू गुरू पूज्य भदंत डॉ. राहुल बोधी महाथेरो (विपशचार्यां) व इतर अनुयायी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाड शहरात असलेल्या शिवाजी पुतळ्यास हार घालून अभिवादन केले. तसेच ऐतिहासिक क्रंतिस्तंभ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन केले.

यावेळी प्रकाश आंबेडकर, अध्यक्षा, वंचित बहुजन आघाडी यांनी देखील  क्रंतिस्तंभ येथे येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.

याप्रसंगी  धम्मसेवक नागसेन कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष शरद कांबळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण समन्वय समितीचे पदाधिकारी शिरिष चिखलकर, शशिकांत बर्वे, श्रीधर जाधव, राहुल कांबळे, गोविंद खडमलकर, विनायक कांबळे इत्यादी मान्यवर भिखु, आंबेडकर अनुयायींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवाद केले.

हे देखील वाचा ,

खांडक्या’च्या नगरीत गुंड परप्रांतीयांचे साम्राज्य !

पन्नास लाख रुपयाची खंडणीसाठी शिक्षकासह मुलाचे अपहरण करणाऱ्या पाच जणांना अटक

राज्यातील पहिली गोंडी भाषिक शाळा गडचिरोलीच्या मोहगाव येथे सुरू

Clead stori narendra modi bhagatsingkoshyari M Uddhav Thakarey