सर्वात मोठी बातमी: उद्धव ठाकरे यांचा उद्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा..

"वर्षा" निवासस्थानातून "मातोश्री"वर मुक्काम हलवला...
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

मनोज सातवी,

मुंबई २२ जून : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार हे आता स्पष्ट झाले आहे. आज त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला, त्यात उद्धव ठाकरे यांनी जनतेला आणि बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन करीत, मी मुख्यमंत्रीपदाचा आणि शिवसेना पक्ष प्रमुख पदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे म्हटले. परंतु एकनाथ शिंदे महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने, आणि त्यामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उद्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपला वर्षा निवासस्थानातील मुक्काम मातोश्रीवर हलवला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकी नंतर सोमवारी संध्याकाळी शिवसेना नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या आणि शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या ३५ आमदारांना घेऊन सुरत गाठून बंडाचे निशाण फडकवले. सोमवारपासून सुरु झालेल्या या राजकीय नाट्याच्या  पार्श्वभूमीवर आज मुख्यमत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडी सरकार टिकवण्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत यावर विचार मंथन करण्यात आले.

तर, दुसरीकडे गटनेते पदी स्वतः एकनाथ शिंदे कायम राहत, विधिमंडळ पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांना हटवून त्यांच्या जागी भरत गोगावले यांची नेमणूक केल्याचे दोन ठराव पारित करून पक्ष प्रमुखांचे आदेश धुडकावले. तसेच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने शिवसेनेसोबतच महाविकास आघाडीची राजकीय कोंडी झाली आहे. या पार्शवभूमीवर वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, तसेच काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ, नाना पटोले, अशोक चव्हाण यांच्यासह इतर नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.  

परंतु एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उद्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे आज त्यांनी आपला वर्षा निवासस्थानातील मुक्काम मातोश्रीवर हलवत मुख्यमंत्री पदाला जय महाराष्ट्र करण्याचे ठरवले आहे. 

Clead stori narendra modi bhagatsingkoshyari M Uddhav Thakarey