त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती साजरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

मुंबई, दि. ७ फेब्रुवारी : माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२४ वी जयंती आज मुंबईतील वरळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या रमाई स्मारकात “माता रमाई प्रतिष्ठान” च्या वतीने व “डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती” यांच्या वतीने साजरी करण्यात आली.

यावेळी पूज्य भदंत शांतीरत्न थेरो यांच्या उपस्थित सामुदायिक वंदना धम्मदेसना घेऊन व लाडुवाटप करून साजरी करण्यात आली.
या प्रसंगी बोलतांना भन्ते म्हणाले रामाईचे विचार व बाबासाहेबांप्रती त्यांचे समर्पण सर्व स्रियांना प्रेरणा व जगण्याचा मार्ग देईल.

या प्रसंगी बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी माता रामाईस सर्व जनतेच्या वतीने अभिवादन केले व माता रामाईचा इतिहास कळावा म्हणून इथे शासनाने भव्य राष्टीय स्मारक उभारावे अशी मागणी केली.

या प्रसंगी महानगर पालिका सहायक आयुक्त शरद उघडे व समाजातील प्रतिष्टीत मंडळी उपस्थित होती. ज्या ठिकाणी रमाईना दहन करण्यात आले तिथे म्हणजे वरळी स्मशानभूमी परिसरात असलेल्या स्मारक  पुतळ्याजवळ सदर कार्यक्रम घेण्यात घेण्यात आला. या स्मरकास सकाळ पासून विविध संघटना व मंडळांचे प्रतिनिधी, महिला अभिवादन करीत आहेत.

हे देखील वाचा :

मोठी बातमी : गॅस गिझर लिक झाल्याने महिला पायलटचा मृत्यू

तब्बल आठ महिन्यांनी दफन केलेला मृतदेह काढला बाहेर..

 

lead news