देवेंद्र फडणवीस यांनी पवार कुटुंब फोडलं, रोहित पवार यांचं मोठं विधान

रोहित पवार यांचा देवेंद्र फडणविस यांच्यावर गंभीर आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. नेत्यांच्या प्रचारसभा होत आहेत. कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादी शरद पवार  गटाचे नेते रोहित पवार निवडणूक लढवत असून  आज जामखेडमध्ये रोहित पवार यांची सभा झाली. त्यावेळी  रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला की देवेंद्र फडणवीस यांनी आमचं घर फोडलेले आहे. कोविड काळात आम्ही लोकांची सेवा केली आणि सत्तेतील  लोक घरी बसून मजा करत होते . राम शिंदे यांना जिथे मत मिळाली तिथे देखील आम्ही पाण्याचे टँकर दिले. लांपीचा रोग आला तेव्हा ते कुठे गायब झाले ते कुठल्या घरी गेले माहित नाही. पवारांची ताकद कमी नाही, फक्त फोन कोणासाठी करायचा हे महत्वाचे असं रोहित पवार म्हणाले.

देवेंद्र फडणवीस  म्हणाले  होते की, रोहित पवारांना मतदार संघात अडकवून ठेवा मात्र त्यांना ते जमले नाही.  लोकसभेला अमित शहा म्हणाले पवार साहेबांनी दहा वर्षात काय केले.  लोकांनी त्यांना लोकशाही मार्गाने उत्तर देत 9 जागा दिल्या.  आपलं सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची कर्ज माफी होणार आहे. तर लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही .आपण भरघोस  मतांनी निवडून येणार  असा विश्वास रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.

गेली पाच वर्षी घरी बसले होता,  येथील जनता लय हुशार आहे. आम्ही पैसा दारू वाटली नाही  लोकांना मद्दत केली. मी कधी खालच्या पातळीवर बोललो नाही, भाषण केले नाही. काहीजण विचारतात की, तू बाहेर का प्रचाराला जातो? तेव्हा मी सांगितले माझा येथील लोकांवर  विश्वास आहे, असं रोहित पवार जामखेडच्या भाषणात म्हणाले.