विधानसभा निवडणुकीमुळे विधान परिषदेच्या ६ जागा झाल्या रिक्त,

कुणा - कुणाला लागणार लॉटरी,

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यात त्यामध्ये विजय मिळवण्याच्या दृष्टीने  महायुतीने अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते.त्यात  विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांनाही  विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्टपणे बहुमत मिळाले आहे. तर महाविकासआघाडीचा दारुण पराभव झाला. त्यात  विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांचा विजय झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ६ जागा रिक्त झालेल्या आहेत.  महायुतीने 230 जागांवर विजय मिळवला. असून महाविकासआघाडीला फक्त 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 20 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट 10 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत.  तर दुसरीकडे विधानसभेत डावललेल्या नाराजांना आता महायुती विधान परिषदेवर संधी देणार आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनेक दिग्गजांना मैदानात उतरवले होते. यात विधानपरिषदेवर आमदार असलेल्या काही नेत्यांच्या नावांचाही समावेश होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानपरिषदेवर असलेल्या आमदारांचा विजय झाला आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या ६ जागा रिक्त झाल्या आहेत. आता या रिक्त जागांवर पक्षात  नाराज असलेल्यांना उमेदवारांना  संधी दिली जाणार आहे.

विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेतील भाजपचे  ४ आमदार निवडून आलेत  त्यामुळे विधानपरिषदेत भाजपच्या ४ जागा रिक्त झाल्या आहेत. तर शिवसेनेकडून एका उमेदवाराची  विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे शिवसेनेची एक जागा विधानपरिषदेत रिक्त झाली आहे. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून  एका उमेदवाराची  विधानसभेवर निवड झाली आहे. त्यामुळे त्यांची विधानपरिषदेची जागा रिक्त झाली आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या नाराजाला शांत करण्याची  संधी आहे.  या नुसार महायुतीच्या विधानपरिषदेच्या एकूण ६ जागा रिक्त झाल्या आहेत. यामुळे आता महायुतीचे तिन्ही घटकपक्ष नेमकं कोणाला संधी देणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.