लाखोंच्या कोंबडा शर्यतीचं बिंग फुटलं; असंख्य दुचाक्या जप्त, १४ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पोलिसांच्या रेडनंतर अनेकांनी काढला पळ, सागवाणाच्या जंगलात सुरू होता लढाईच्या शर्यतीचा खेळ   

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वर्धा, दि. ६ डिसेंबर : सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोंबडा शर्यतीचा जुगार चालत असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेकडो लोकांच्या उपस्थितीत हा जुगार सुरू असताना पोलिसांनी रेड टाकली आणि या कित्येक दिवसापासून सुरू असलेल्या लाखोंच्या जुगाराचे बिंग फुटले आहे.

सेलू तालुक्यातील धपकी नजीक झुडपी जंगलात आडोश्याला हा जुगार भरविला जात होता. या प्रकरणात १४ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे  तर या जुगारात अनेक जुगारी फरार आहे. चारचाकी आणि दुचाक्या मोठ्या संख्येत पकडण्यात आल्यात.

वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील कोटंबा नजीक असलेल्या धपकी परिसरात सागवानाच्या शिवारात कातीच्या कोंबड्यांची लढाई करण्याचा जुगार खेडला जात होता. या जुगारात लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची सूत्रांची माहिती आहे.

सेलू पोलिसांनी लढाईच्या जुगारात १४ जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या गाड्या देखील जप्त करण्यात आल्या आहे. कोंबड्यांच्या लढाईत पैशांची शर्यत लावली जात होती. शर्यत लावण्यासाठी नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया सह इतर जिल्ह्यातून मोठं मोठे व्यापारी शर्यतिला आले होते.

ताब्यात घेतलेल्या आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. सेलू पोलीस कारवाई करीत आहे.

हे देखील वाचा :

पॅरासेलिंग करतांंना दोरी तुटली आणि दोन महिला कोसळल्या समुद्रात!…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आलापल्ली वनविभागात कृतज्ञतापूर्वक अभिवादन करून “संकल्प दिवस”साजरा.

तत्कालीन ग्रामपंचायतीच्या सफाई कर्मचाऱ्यांना नवनिर्मित नगरपरिषद/नगर पंचायतीत सामावून घेणार; नगरविकास विभागाचा निर्णय

 

 

lead news