दिव्यांगांना व्यक्तींना मिळाले साहित्य, पाठीवर कौतुकाची थापही

 जि.प. समाजकल्याण विभागाचा पुढाकार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली : ०३ दिसेंबर या  जागतिक दिव्यांग दिनानिमित्त  जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांग व्यक्तींना साहित्य वाटपासह कौतुकाची थापही दिली.  जिल्हा नियोजन भवनात दि. ३ डिसेंबरला  हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आरमोरीचे नवनिर्वाचित आमदार श्री.  रामदास मसराम हे होते. साबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त सीईओ राजेंद्र भुयार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश साळुंखे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी चेतन हिवंज, जिल्हा पुनर्वसन केंद्राचे संचालक अभिजित कार्ड, रेल्वे सवलत प्रमाणपत्र, विविध साहित्य व उपकरणे तसेच ५ टक्के दिव्यांग कल्याण निधी अंतर्गत सामूहिक तथा वैयक्तिक विविध कल्याणकारी योजनेचे लाभ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, गडचिरोली यांचेद्वारा दिव्यांग युवकांकरिता निःशुल्क आयोजित करण्यात येत असलेल्या ‘कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमा’चे उद्घाटन रामदास मसराम व आर. आर. पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रशिक्षण निवड प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. यावेळी साहित्य व सत्काराने दिव्यांग बांधव भारावून गेले होते. जि.प