LIC कन्यादान पॉलिसी: २५ वर्ष रोज १३० रुपये भरा आणि मुलीच्या लग्नासाठी मिळवा २७ लाख रुपये

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, 21 जून: मुलांचा जन्म होताच पालक मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करून पैसे जमा करण्यास सुरुवात करत असतो. पालकांसमोर आपल्या मुलांचे शिक्षण आणि लग्न हे दोन मोठे उद्देश असतात. विशेषतः मुलगी असेल तर तिच्या शिक्षणाबरोबरच लग्नासाठीही भरभक्कम तरतूद करण्याची पालकांची धडपड असते.

मुलींच्या चांगल्या भविष्यासाठी सरकारही अनेक योजना राबवित आहे. सरकारनं मुलींच्या भविष्यासाठी तरतूद करण्याकरता पोस्टाच्या माध्यमातून सर्वोत्तम व्याजदर देणारी सुकन्या समृद्धी योजना दाखल केली आहे. त्यामुळं कमी गुंतवणुकीत अधिक लाभ मिळवण्याची संधी पालकांना उपलब्ध झाली आहे.

एलआयसी (LIC) अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या योजनाही सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या असतात. कुटुंबाच्या भविष्याची तरतूद करणाऱ्या एलआयसीच्या योजना कोट्यवधी नागरिकांचा आधार आहेत. आता एलआयसीनंही मुलींच्या भविष्याची तरतूद करण्यासाठी एक विशेष योजना आणली आहे. या योजनेचं नाव आहे एलआयसी कन्यादान पॉलिसी एलआयसीची ही योजना अल्प उत्पन्न असलेल्या पालकांना त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी पैसा साठवण्यास मदत करते.

कन्यादान पॉलिसी :

एलआयसीच्या या कन्यादान पॉलिसीमध्ये गुंतवणूकदाराला दररोज 130 रुपये (वार्षिक 47,450 रुपये) जमा करावे लागतात.  25  वर्षानंतर एलआयसी पॉलिसीधारकाला सुमारे 27 लाख रुपये देईल. ही पॉलिसी घेण्यासाठी गुंतवणूकदाराचे किमान वय 30  वर्षे आणि गुंतवणूकदाराच्या मुलीचे किमान वय एक वर्ष असणे आवशयक आहे. पॉलिसीचा किमान कालावधी 13 वर्षे आहे.

कोणत्याही कारणामुळे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास एलआयसीच्या वतीनं त्या व्यक्तीला अतिरिक्त 5 लाख रुपये दिले जातात. एखाद्या व्यक्तीने 5 लाखांचा विमा घेतला तर त्याला 22 वर्षांसाठी मासिक 1951 रुपये भरावे लागतील.

मुदत पूर्ण झाल्यावर एलआयसीकडून पॉलिसी धारकाला 13.37 लाख रुपये मिळतील. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीनं 10 लाखांचा विमा घेतला तर महिन्याला 3901 रुपये हप्ता भरावा लागेल. 25 वर्षानंतर एलआयसीकडून 26.75 लाख रुपये दिले जातील.

करसवलतही मिळते :

प्राप्तिकर अधिनियम (Income Tax Act) 1961 च्या कलम 80 सी (80 C) अंतर्गत गुंतवणूकदाराला भरलेल्या प्रीमियमवर कर सवलत (Tax Benefit) मिळू शकते. कर सवलत जास्तीत जास्त 1.50 लाखांपर्यंत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, ओळखपत्र, जन्मदाखला इत्यादी महत्त्वपूर्ण कागदपत्रांची आवश्यकता असते.

हे देखील वाचा :

जागतिक योगा दिनानिमित्त कारागृहात ऑनलाईन योग शिबिराचे आयोजन

दिग्गज क्रिकेटपटू… आता बॉलिवूडच्या ‘या’ सिनेमात करणार लीड रोल

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर!,आता IRCTC मधून तिकीट रद्द केल्यावर लगेच मिळणार रिफंड

 

lead storylic kanyadan policy