पबजी खेळाच्या वादातून 20 वर्षीय तरुणाचा खून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

ठाणे, दि. २ मार्च :  ठाण्याच्या वर्तकनगर परिसरात पब्जी खेळात वारंवार जिकंण्यावरून झालेला वाद हा २२ वर्षीय साहिल बबन जाधव तरुणाच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. या वादाचा राग मनात धरून सोमवारी रात्री मुख्य आरोपीसह अन्य दोन अल्पवयीन तरुणांनाही चाकू, सुरे, तलवारीने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात साहिलचा मृत्यू झाला. पोलिसांनी तिघांवर खुनाचा गुन्हा वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल करीत अटक केली आहे.

या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात ही हत्या पब्जी खेळाच्या वादातून झालेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मृतक साहिल जाधव पब्जी खेळात हुशार होता. तिन्ही आरोपी हे संगनमत करीत पब्जी खेळात मृतक साहिल जाधव याला नेहमी किल करीत होते. यावरून २०१९ मध्ये साहिल आणि अटक तिन्ही आरोपींचा वाद आणि किरकोळ हाणामारी झाली होती.

या वादाची अदखलपात्र तक्रारही वर्तकनगर पोलीस ठाण्यात साहिलने दिलेली होती.  याचाच राग मनात धरून १ मार्चच्या पहाटे २-३९ वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रणव प्रभाकर माळी, राहुल महादेव गायकवाड आणि गौरव रवींद्र मिसाळ यांनी एकत्र येऊन साहिल जाधव याला पब्जी खेळात किल करायचे, दरम्यान वादा नंतर आता प्रत्यक्षात किल करण्याचे ठरविले आणि त्यांनी चाकू, सूरा आणि तलवारीच्या सहाय्याने साहिल याला जानकीदेवी चाळ, जुनी पाईपलाईन जवळ गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. साहिलच्या छातीत, पाठीत, डोक्यावर, गुडघ्यावर वार करून भोकसले. यात साहिलचा मृत्यू झाला.

वर्तकनगर पोलिसांनी या हत्येप्रकरणी एका मुख्य आरोपी प्रणव यांच्यासह दोन अल्पवयीन आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. तिघांनाही अटक करून न्यायालयात नेले असता त्यांना ६ मार्च पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. तर प्रणव याला वर्तकनगर पोलीस कोठडीत तर अल्पवयीन आरोपी राहुल आणि गौरव याना भिवंडीच्या बालसुधार गृहात रवानगी केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.व्ही. निकम यांनी दिली.

हे देखील वाचा  : 

विरोधक कितीही गोंधळ घालूदेत नवाब मलिक यांचा राजीनामा नाही म्हणजे नाही – जयंत पाटील

शौचालयाची टाकी साफ करताना तिघांचा नव्हे तर चौघांचा मृत्यू…!

विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण कराव्यात – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

 

lead news