लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
सांगली, दि. १९ फेब्रुवारी : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील शिगाव गावचे सुपुत्र रोहित तानाजी चव्हाण यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले आहे. दक्षिण जम्मू – काश्मीर येथील सोफिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. राष्ट्रीय रायफलचे जवान रोहित तानाजी चव्हाण हे लढताना शहीद झाले. या चकमकीत एका दहशतवाद्यास कंठस्नान घालण्यात आले.
३ मार्च १९९९ ही रोहितची जन्मतारीख असून अवघ्या २३वर्षाच्या रोहितने देशासाठी हौतात्म्य पत्करले.
रोहितचे वडील तानाजी चव्हाण हे राजारामबापू पाटील ग्रुप मध्ये कामगार म्हणून कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे तर बहीण शिक्षण घेत आहे.
पाच वर्षांपूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते. चार महार येथून त्यांच्या सेवेला सुरुवात झाली होती.
एक वर्षांपूर्वी जम्मू काश्मीर येथे १ राष्ट्रीय रायफल मध्ये पोस्टिंग झाले होते. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यानी जवानांवर गोळीबार सुरू केला. यामध्ये शिगाव येथील रोहीत चव्हाण व उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.
शिगाव गावासह भागात ही बातमी समजताच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. गावावर शोककळा पसरली आहे. पार्थिव रविवारी संध्याकाळपर्यंत गावात येण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा :
शिवजंयती निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी साकारली तलवारीवर शिवसृष्टी..