राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे आयुष्य समाजाच्या उध्दारा करीता समर्पीत – डाँ शिवनाथ कुंभारे

शिव मंदिर अल्लापल्ली येथे तुकडोजी महाराजांची ग्रामजयंती गावकऱ्यांनी केली साजरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

आलापल्ली, दि. २३ एप्रिल :  अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली शाखा गोकुलनगरच्या वतीने शिव दत्तात्रय मंदिरात सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भजन,पुजन,ध्यान, सामुदायीक प्रार्थना” करुन वंदणीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, कर्मयोगी गाडगे महाराज यांचे जिवन शैलीवर व त्याच समाज हिताच्या महान कार्यवर प्रबोधनातून प्रकाश टाकला.

तुकडोजी महाराजांनी आपले संपुर्ण जिवन समाजाच्या उध्दारा करीता समर्पीत केले. महाराजानी ग्रामगितेतून गामस्थान जागवून शुभ संदेश दिला.

महाराजाचे कार्य समाजाला वर्षोनीवर्षे प्रेरणा देणारे असून सुंदर समाज घडवायचे असेल तर, ग्रामगितेचा प्रत्येकानी वाचन करून ध्यास धरावा आणि खेड्यापाड्यात ग्रामगितेचा प्रचार, प्रसार करुन ध्यान,सामुदायीक प्रार्थना करावे.

प्रबोधनातून ग्रामस्थाना सन्मार्ग दाखविण्याचे महान कार्य गुरुदेव भक्तीनी कार्य करावे. अहेरी उपविभागात पाच तालुक्याचा समावेश असून आलापल्ली हे गाव केंद्रबिंदू असल्याने श्री  गुरुदेव सेवा मंडळाने  केंद्रस्थान निर्माण करावा. असे मत प्रबोधना दरम्यान श्री गुरुदेव सेवामंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ, शिवनाथ कुंभारे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला माजी आमदार दिपक आञाम यांनी शुभेच्छा दिले. या वेळी आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम, माजी नगराध्यक्ष हर्षाताई ठाकरे, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलानाचे जिल्हाध्यक्ष विजय खरवडे, से.नि.प्रा.पद्मनाभ तुंडूलवार, राणी दुर्गावती कनिष्ट महावीद्यालयाचे मुख्याध्यापक गजानन लोनबले, सह्याद्री वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी तथा लोकस्पर्श न्युजचे संपादक ओमप्रकाश चुनारकर, पत्रकार मिलीन्द खोंड, साईबाबा भटपल्लीवार, व्यंकटेश मदेर्लावार, वासुदेव पेद्दीवार, से.नि.वनपाल पेंपकवार, मुख्य शाखेचे सचिव पंडितराव पुडके, रामनगर शाखेचे ग्रामसेवाधिकारी सुरेश मांडवगडे, सचिव कवडुजी येरमे, गोकुलनगर शाखेचे ग्रामसेवाधिकारी सुखदेव वेठे, उपग्रामसेवाधिकारी अनिलजी धात्रक सचिव पुरुषोत्तम कुलमेथे, कोषाध्यक्ष मारोतराव उईके, सहसचिव अमित तिवाडे, आजीवन प्रचारक नानाजी वाढई, आत्मारामजी आंबोरकर, प्रचारक नथुजी चिमुरकर, भजन प्रमुख माणिकराव गेडाम, पुजारी किसन मडावी, संचालक भास्कर नरुळे, कालबांधे सर, मुडझाचे ग्रामसेवाधिकारी घनश्याम दादा जेंगठे, अंधश्रद्धा निर्मूलनचे विलास निंबोरकर, मोहन मदने, सामाजिक कार्यकर्ते रविदादा ठाकरे, टायगर ग्रुपचे अध्यक्ष दौलत रामटेके, सागर रामगोणवार, कुणाल वडधलवार, आदर्श कोसनवार, टायगर ग्रुपचे सर्व युवा कार्यकर्ते, जिल्हा उपाध्यक्ष गुड्डू दुर्गे, महीला अध्यक्ष ज्योती कोलमलवार, शिलाताई राजुरकर, विमल धुळसे, मनोरमा तलांडे,वनिता खरवडे,रेणु टिचकुले, मोहन मदने,चेतन कञोजवार,संतोष मल्यालवार,यशवंत मडावी,अनिकेत खरवडे,गौरव लुथड,रमेश आईंचवार,कलीम कुरेशी,सामलवार, नितीन खरवडे,महिला भजन मंडळाचे कार्यकर्ते,पुरुष भजन मंडळाचे कार्यकर्ते, तसेच नगरातील जनता जनार्दन बहुसंखेने उपस्थित होते.

या कार्यक्रमात डॉ. विश्वनाथ कुंभारे, विजय खरवडे, ओमप्रकाश चुनारकर, विलास निबोरकर, अलापल्लीचे सरपंच शंकरराव मेश्राम यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन पुरुषोत्तम कुळमेथे यांनी प्रास्ताविक नथुजी चिमुरकर, तर आभार प्रदर्शन मिलीन्द खोंड यांनी केले. त्यानंतर राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता  करण्यात आले.

हे देखील वाचा : 

स्वच्छता हा निरोगी आयुष्य जगण्याचा पाया आहे : कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे

‘किसान भागीदारी प्राथमिकता हमारी’ या मोहिमेतंर्गत शेतकऱ्यांना मिळणार किसान क्रेडीट कार्ड

उद्याच्या सुदृढ युवा पिढीसाठी जंतनाशक मोहिम यशस्वी राबवा – संजय मीणा, जिल्हाधिकारी

 

lead news