भंडारा जिल्ह्यातील पवनी नगर परिषद चे स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आजपासून कामबंद आंदोलन सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भंडारा, दि. २३ मार्च :  पवनी तालुक्यातील नगर पंचायत स्वच्छता कर्मचारी आजपासून कामबंद आंदोलनावर बसले आहे. किमान वेतन, गणवेश, आरोग्य विषयी सोई, कंत्राटी पद्धत बंद करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन हे तब्बल ४० ते ४५ महिला व पुरुष कंत्राटी कर्मचारी आजपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे.

विशेष म्हणजे हेच स्वच्छता कर्मचारी पवनी शहरातील कचरा व्यवस्थापन व इतर बाबी पाहतात मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून त्यांना शासनाने निर्धारित केलेल्या किमान वेतन पेक्षा अल्प असे वेतन देण्यात येते शिवाय हेच स्वच्छता कर्मचारी कोविड काळात फ्रंट वर्कर मंहून ओळखल्या जात होते मात्र त्या काळात देखील उलेककनीय काम केल्या नंतर देखील त्यांचा मागणी कडे दुर्लक्ष करण्यात आले सरते शेवटी त्यांनी आजपासून काम बंद आंदोलन पुकारले असून जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरु राहणार असल्याचा पवित्रा या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.

हे देखील वाचा : 

गडचिरोलीतील विशेष आहार योजनेचे यश

पोलीसांची अशीही माणुसकी

सुरक्षा वाढविताच वर्धा कोर्टात प्रवेश करणाऱ्याकडे सापडला चाकू

 

 

lead news