लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बारामती विधानसभा मतदार संघात काका अजित पवार आणि पुतणे युगेंद्र पवार यांच्यात लढत होत आहे. ही लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी पाहिली जात आहे. अजित पवार यांनी बारामती विधासभा मतदार संघात आपणच दादा असल्याचे म्हटले आहे. लोकसभेत आपला करेक्ट कार्यक्रम झाला आता विधानसभेत लोक आपल्यासोबत असतील, असे म्हटले होते. त्यावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी शरद पवार यांनी दोन शब्दांत उत्तर दिले. ‘बघू आता मतदान आहे इतके बोलून त्यांनी विषय संपवला.